छत्रपती शिवाजी महाराज पुरातनवस्तू संग्रहालय संभाजीनगर.

पत्ता: शासकीय कला आणि विज्ञान कॉलेज जवळ , हिमायत बाग, संभाजीनगर, महाराष्ट्र 431004

दिवस वेळ

सोमवार. 10:30 am – 6:00 pm
मंगरवर 10:30 am – 6:00 pm
बुधवार 10:30 am – 6:00 pm
गुरुवार बंद
शुक्रवार 10:30 am – 6:00 pm
शनिवार 10:30 am – 6:00 pm
रविवार 10:30 am – 6:00 pm

प्रवेश मूल्य:

प्रौढसाठी (Adults) – 5ru

मुलांसाठी (Children) – 2ru

उद्देश:

ज्या वेळेस संभाजीनगर (औरंगाबाद) महानगर पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. त्यावेळेस महानगर पालिकेने 200 लोकांची सल्लागार समिती स्थापन केली होती. या समितीच्या सह्याने शिवकालीन वस्तू एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केला गेला.पण जास्त वस्तू भेटत नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात टेवण्यासाठी वस्तू भेटत नाही हा प्रश्न त्यावेळी वर्तमान पत्रात खूप गाजला होता. असे प्रकाश शांतीलाल पुरवाल सांगतात.

त्यावेळी डॉ. शांतीलाल शंकरलाल पुरवाल यांनी आपल्या जीवनात ज्या वीस हजार शिवकालीन वस्तू जमा केलत्या. त्यातून (आपल्या मातोश्री कौशल्य पुरवाल वस्तू संग्रहालयातून) तीन हजार वस्तू त्यांनी या संग्रहलयात ठेवण्यासाठी दिल्या.

डॉ. शांतीलाल पुरवाल यांच्या मते आपल्या देशातील ज्या या पुरातन वस्तू आहे.या दुसऱ्या देशात जात होत्या. म्हणून डॉ.शांतीलाल पुरवाल यांनी या 3 हजार वस्तू छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात तेवण्यासाठी दिल्या आणि 28 जानेवारी 2005 ला सार्वजनिककरण्यात आले . जेणेकरून या वस्तू भारतातील लोकांना पाहायला मिळाव्यात आणि त्यावरून त्यांना माहीत होईल की आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ होती. युद्ध सामग्री कशी होती. आणि बरच काही.

बगण्यासाठी काय आहे ?

संग्रहलया मधी चित्रे(photo)किंवा चित्रफीत(videos) घेण्यासाठी प्रतिबंध आसल्या मूळ काही जास्त चित्रे घेता आले नाही. तरीही काही बाहेरील आवरणातील चित्र आणि शाब्दिक वर्णनात थेतील दृश्य तुमच्या समोर मांडण्याचं प्रयत्न करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहाल हे शासकीय कला आणि विज्ञान कॉलेज,हिमायत बाग जवळ आहे. संग्रहलयाच्या उजव्याबजुला रंगीन दरवाजा (52 दरवाज्या पैकी एक) आणि डाव्याबाजूला थोडे वळण घेतले की दिल्ली दरवाजा.

संग्रहालयाच्या प्रवेद्वाराजव दोनी बाजूंनी दोन-दोन मावळे तुतारी आणि डोल वाजवतानी.

प्रवेद्वारातून प्रवेश करताच समोर दिसतो शुभारंभाचा फलक आणि त्याच्या थोड समोर बागितल की उजव्याबाजूला संग्रहालय उभारणीसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांच्या नावाचा फलक आणि डावीकडे जिवाजी महालेची जिवंत दिसणारी कोनशिला. तिला पाहून असे वाटते जणूकाही महाराजांच्या पुरातनवस्तू संग्रहालयाच रक्षण करण्यासाठी आजही स्वतः जिवाजी महाले ऊभा आहे.

आणखी थोड समोर गेलं की इमारतीत प्रवेश होतो. प्रवेश करता क्षणी समोर भवानी माता महाराजांच्या हातात तलवार देतानी दिसते. तसेच इमारतीच्या आतल्या बाजूने काडलेली सुंदर अशी चित्रे ही आहे.

ही इमारत 6 वेगवेल्या भागात विभागलेली आहे. त्या पैकी 5 भागात वेगवेगळ्या वास्तू तुम्हाला पाहायला मिळेल.

पहिल्या भागाला नाव दिलेलं आहे शिवरांची युद्धनिती ज्यामधी तुम्हाला त्या काळातील वेगवेगळी शस्त्रे, त्याची नावे,ती कशी चालवायची याची माहिती मिळेल. तसेच चिलकद,तलवारी (देहली, सैप, गुल्हरी, धोप जी महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरली जायची इ.), पंच धातू पासून बनलेली तोफा, चिलकदाच्या विरोधात वापरली जाणारी शस्त्रे(विटा, फरशी कुऱ्हाड, गुरुज इ.)ज्या नखांनी महाराजांनी शत्रूचा कोथळा कडला होता तशीच वाघ नख, हस्तकवच, पोलादी कट्यार, दांड पट्टा,बंदुकी, भाले (भल्लम भाले, बरच्छा भाले इ), मांडो काळवीटच्या शिंगापासून बनलेली दोन्ही बाजूला धार असलेली.

हे सर्व पहिल्या विभागात बघायला मिळेल. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजची आणि स्वराज्याच्या धाकल्या धनीची पेंटिंग फोटो.

त्यानंतर समोरच्या विभागात शिवकालीन नाणी, राणी महालातील काही वस्तू, आडकिते, कुलदेवता, कृष्णा,हनुमान, यांची मुर्ती आणि बऱ्याच इतर छोट्या – छोट्या मुर्ती, त्याकाळातील समई /दिवे.

छत्रपतींच्या या संग्रहालया बद्दल लीहण्या, बागण्या सारखं खूप काही आहे. संग्रहालय छोटच आहे पण एका शिवभक्ताला शिवराज्यत प्रवेश केल्याची feeling इथ मिळते.

तर नक्की एकदा छत्रपतींच्या या छोट्याश्या शिव विश्वाला भेट द्या.

आणि गेला तर संभाजी महाराजांच्या पेंटिंग शेजारी असलेले लेख पण नक्की वाचा ‘ धर्म परिवर्तन कोणी करावे कोणी करू नये’ त्याबद्दल आहे.

शेवटी एकच विनंती लेख आवडला तर तुमच्या मित्राला पण पटवा.

धन्यवाद!

Automobile industry

Automobile industry

आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे की टेक्नॉलॉजी खूप वेगाने विकसित होत आहे. सर्व क्षेत्रात कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. मग बऱ्याच वेळेस आपण मित्रांसोबत ही चर्चा करत असताना काही प्रश्न पडतात की ५ वर्षांनी किंवा १० वर्षंनी जग कसे असेल? कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी येतील? त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपल फ्युचर काय असेल?

चला तर बघुया या लेखात Automobile Industry बद्दल……

दहा वर्षानंतर ची ऑटोमोबाइल इंडस्ट्री कशी असणार ?


1950 ते 1965 पर्यंत कलर टीव्ही चा मोठा वाटा फक्त 2% होता 1965 ते 1980 दरम्यान ती वाढून 80% झाली आणि 1984 पर्यंत ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पूर्णपणे बाजारातून बाहेर गेल्या 1965 हा रंगीत टीव्हीसाठी टिपिंग पाॅईंट होता.


तंत्रज्ञानातील बदलांमुळे  बरीच मोठमोठी व्यावसायिक घराणी संपताना आपण पाहिली आहेत.याचे नवीन उदाहरण म्हणजे इतर मोबाईल कंपन्यां जिओ मुळे संपत आल्या आहेत.

2009 पर्यंत उबरचा जन्मही झाला नव्हता आज अवघ्या 10 वर्षात उबर जगातील संपूर्ण टॅक्सी बाजारात व्यापतो. गेल्या 10 वर्षात उबर दरवर्षी 100% पेक्षा अधिक नाफ्यात आहे. आज जगभरातील सर्व कंपन्यांच्या तुलनेत केवळ उबर एकटे जास्त टॅक्सी बुकिंग करतात.

टोनी सेबा म्हणतात की 2020 मध्ये आणखी एक टिपिंन पॉईंट येत आहे एलेक्ट्रिक वेहिकल, ड्रायव्हरलेस वेहिकल,आणि उबर,ओला सारखे सॉफ्टवेअर या तीन गोष्टी येत्या 5 वर्षात ऑटोमोबाइल जगाचे चित्र बद्दलतील.सुप्रसिद्ध कंपन्यां जे वेळेवर पाऊल उचलणार नाहीत त्यांचा शेवट निश्चित आहे.

कशी असेल ड्रायव्हर लेस वेहिकल आणि इलेक्ट्रिक व्हेईकल 

सध्याची परिस्थिती सांगत आहे की हे सुरू आहे कारण विलीनीकरण मोबाईल कंपन्या आपसात करीत आहेत वाहन कंपन्यानाही तेच करावे लागेल.

जगभरात लिथियम आयन बॅटरी बनविणाऱ्या 12मेगा फॅक्टरीज आहेत. सिंगापूरमध्ये ड्रायव्हरलेस कार चालू लागल्या आहेत.बरेच लोक असा प्रश्न विचारतात की किती लोक एलेक्ट्रिक वेहिकल्स किंवा ड्रायव्हरलेस कारची सोय करण्यास सक्षम असतील.

जेव्हा कोणत्याही वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते तेव्हा किंमत वेगाने खाली येतात आणि शंभर रुपयाची वस्तू एक रुपयाला मिळू लागते.

अशी अपेक्षा आहे की 2030 पर्यंत ड्रायव्हर लेस इलेक्ट्रिक वाहने बाजाराच्या ताब्यात येतील आणि सरकार आजच्या व्यक्ती चालीत गाड्यावर बंदी घालतील कारण त्या नंतर सुरक्षेचा धोका बनतील.


याव्यतिरिक्त कारची वैयक्तिक मालमत्ता 2030 पर्यंत संपुष्टात येईल आणि रस्त्यावरच्या गाड्या केवळ टेस्ला, गुगल, उबर आणि ऑन डिमांड यासारख्या कंपन्या चालवतील.


80% कार रस्त्यावरून अदृश्य होतील पेट्रोल-डिझेलचा वापरामध्ये 30 टक्के घट होईल यामुळे सर्व तेल उत्पादक देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि ते दिवाळखोर होतील.

या वरून आपण अंदाजलावू शकतो की याचा आपल्या देशातील जनतेला किती मोठा फटका बसू शकतो. कारण आपल्याला देशातील खूप मोठा वाहण चालक वर्ग हा automobile industry वर अवलंबून आहे. 

हे केवळ एक उदाहरण होत automobile industry च आणखी खूप सार्‍या fild वेगाने विकसित होत आहे.आणि विकास होने चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या दुष्परिणामांना पासून वाचण्यासाठी मार्ग शोधणे ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. 

Let’s think once what are you doings now and what you want to do in upcoming years.

हा लेख तुम्हाला कसा वाटला comment करून नक्की कळवा आणि मित्रांना पण शेअर.

Next post will be on artificial intelligence and hotel industry. So subscribe this blog and stay connected for more……. 


Connect with me:

Instagram:- click here 
Whatsapp :- click here 

What is SWOT Analysis?

◆What is SWOT Analysis? 
S – Strength (बलस्थान)
W – Weakness (कमजोरी)
O – Opportunity (संधी)
T – Threats (धोके )
तुम्ही सवणप्रथम स्वतःचा SWOT Analysis करा, त्यातून तुम्हाला तुमच्याबद्दल बऱ्याच प्रशनांची उत्तरं मिळतील आणि पुढील ध्येय ठरवायला मदत होईल..
प्रत्येका मध्ये काही न काही वेगळे पण असतेच, ते काय आहे ते ओळखा आणि त्यावर काम करा.
● Strength (बलस्थान) – 
तुमच्या Strength काय आहेत ते ओळखा, त्याचा अभ्यास करा, तुमच्या Strength च्या बळावर तुम्ही पुढे जाऊन काय करू शकता याचा अभ्यास करा, तुमची बलस्थाने ओळख आणि त्याच्यावर काम करा, त्यापासून आपण जास्तीत जास्त फायदा कसा मिळवू शकतो याचा अभ्यास करा, प्रत्येकामध्ये काही न काही वेगळे पण असतेच, ते काय आहे ते ओळखा आणि त्यावर काम करा.
● Weakness (कमजोरी) – 
तुमच्या Weakness काय आहेत ते शोधा, त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये कोणती सुधारणा करावी लागेल ते तुम्हाला समजेल, कोणत्या Skill शिकाव्या लागतील याची माहीती मिळेल, त्याचा सराव करा, ज्या Skill शिकायच्या आहेत त्या शिका.तुमचे विकनेस म्हणजे कमजोरी ओळखून त्यात तुम्ही सुधारणा कशी करनार आहे हे ठरवा आणि कृती करा.
● Opportunity (संधी) – 
भविष्यात तुम्हाला कोणत्या नवीन संधी उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करा, त्यांची माणहती घ्या, आणि त्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तयार रहा.
● Threats (धोके) – 
तुम्ही जे काम करण्याचा किंवा जो बिझनेस करण्याचा विचार  करताय त्याला भविष्यात धोके येऊ शकतात,जस की सध्या जग खूप वेगाने बदलत आहे, भविष्यात अशी कोणती गोष्ट आली, कोणती नवीन Technology आली तर तुमच्या बिझनेस ला त्या पासून धोका निर्माण होऊ शकतो ते ओळखा, त्याचा अभ्यास करा आणि त्यावर मात कशी करायची याची प्लॅनींग करा.
स्वतःसाठी SWOT Analysis केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहीती कळते, तुम्ही तुमच्या मध्ये कोणत्या सुधारणा केल्या तर तुम्हाला काय फायदा होईल याची सुद्धा तुम्हाला कल्पना येते आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढील पाऊले उचलू शकता, तुमच्या बिझनेस  साठी सुद्धा SWOT Analysis अत्यंत महत्त्वाचे ठरते, तुम्ही जर उद्योजक असाल किंवा उद्योजक बनवायचा विचार वचार करत असाल तर SWOT Analysis नक्की करून घ्या.
Connect with me on Instagram click here
Connect on Whatsapp click here 
Create your website with WordPress.com
Get started